सागर नाणोसकर: विरोधकांनी टीका करण्यापेक्षा एकत्र येऊन काम करण्याची गरज
वेंगुर्ले, ता.०४ : जिल्ह्याचा विकास होण्यासाठी आपण सर्वपक्षियांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे एखादे चांगले काम होत असेल तर सुट्टीच्या दिवशी सभा लावल्यास बिघडले कोठे?असा प्रश्न युवासेनेचे उपजिल्हाधिकारी सागर नाणोसकर यांनी केला.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी पालकमंत्री दीपक केसरकर सुट्टीच्या दिवशी सभा घेतात अशी टीका करून त्यांना व नियोजन अधिकाऱ्यांना कॅलेंडर भेट दिले होते. या टीकेनंतर श्री नाणोसकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे की लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहेत. त्यांना सूट्टी नाही आणि अधिका-यांच्या वर वरिष्ठ अधिकारीही आहेत.त्यांनी एकमेकांशी चर्चा करून ठरवावे की सुट्टिच्या दिवशी सभा घ्यावी कि नको, तस पाहिले तर ते शासनाचे नोकर आहेत त्यामुळे एखाद्या लोकप्रतिनिधीला अस बोलणं शोभत नाही.
पालकमंत्र्यांनी सुट्टिच्या दिवशी सभा लावली तर बिघडले कोठे ? तस बघितलं तर पाच वर्षेच असतात. एखाद्या लोकप्रतिनिधीला काम करण्यासाठी त्यात जास्तीत जास्त विकासकामे होणे आवश्यक आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री राणेंनी आतापर्यंत जेवढा निधी त्यांच्या कार्यकाळात आणला नाही. त्यापेक्षा दूप्पट निधी फक्त पाच वर्षांत दीपक केसरकरांनी आणला यांची नोंद टिका करणाऱ्यांनी घ्यावी.सुट्टी वगैरे या गोष्टीचा बाऊ बनवणं हे लान्छनास्पद आहे असे ही या पत्रात म्हटले आहे.