Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामळगाव रेल्वे स्टेशन रोड मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प...

मळगाव रेल्वे स्टेशन रोड मार्गावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प…

वाहनांच्या रांगा; झाड हटविण्याचे कार्य सुरू…

सावंतवाडीता.०४: येथील मळगाव रेल्वे स्टेशन परिसरातील नंदनगरी समोर रस्त्याच्या मधोमध भलेमोठे झाड पडल्यानें वाहतूक टप्प झाली आहे.ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान या ठिकाणी गाड्यांची मोठी रांग लागली आहे.
काल पासून सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे.सोसाट्याच्या वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठिकाणी मोठी पडझड होत आहे.आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने हे झाड रस्त्यावर कोसळले.त्यामुळे याचा परिणाम या रस्त्याने जाणाऱ्या एसटी फेऱ्यावर होण्याची शक्यता आहे.दरम्यान हे झाड बाजूला करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments