Monday, April 28, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मीडिया समन्वयकपदी अमोल टेंबकर

मराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मीडिया समन्वयकपदी अमोल टेंबकर

निमंत्रकपदी विकास गावकर यांची निवड

सिंधुदुर्गनगरी, ता.४ : मराठी पत्रकार परिषदेच्या सोशल मीडिया सेलच्या सिंधुदुर्ग जिल्हा निमंत्रकपदी पत्रकार विकास गावकर तर जिल्हा समन्वयकपदी पत्रकार अमोल टेबकर यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड नुकतीच मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, सोशल मीडिया सेलचे निमंत्रक बापूसाहेब गोरे, सरचिटणीस अनिल महाजन, समन्वयक अनिल वाघमारे यांच्याकडून जाहीर करण्यात आली.मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने प्रिंट मीडिया सोबत वेब पोर्टल, युट्युब आदी सोशल मीडियावर पत्रकारिता करणाऱ्या चॅनेलसाठी सोशल मीडिया सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलच्या जिल्हा समन्वयक पदी श्री टेबकर यांना तर निमंत्रकपदी गावकर यांची दोन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.
श्री टेंबकर हे गेली अनेक वर्षे पत्रकारितेत आहे. त्यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्स पुढारी सकाळ अशा वृत्तपत्रांमधून पत्रकारितेचा प्रवास केला.सदयस्थितीत ते ब्रेकींग मालवणीची जबाबदारी सांभाळत आहेत. तर श्री गावकर गेली २६ वर्षे पत्रकारीतेत आहेत. आता ते झी २४ तास आणि कोकण नाऊची जबाबदारी सांभाळत आहेत.सोशल मीडियात सुरू असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोशल मीडिया समिती स्थापन करून सदस्य निवडण्यात येणार आहेत असे त्यांच्याकडुन सांगण्यात आले. दरम्यान या निवडीनंतर मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गजानन नाईक सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments