आंबेरीत हिर्लोक-सावंतवाडी एसटी बस कलंडली

2

कुडाळ ता.०४: तालुक्यातील आंबेरी डीडी पॉइंट येथे जिओ केबल टाकण्यासाठी मारलेला चर खचल्यामुळे हिरलोकहिर्लोक-सावंतवाडी एसटी बस त्यात रुतून अपघात झाला.ही घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
माणगाव खोऱ्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे.त्यात जिओ केबल टाकण्यासाठी ठेकेदाराने मारलेल्या चरात योग्य प्रकारे भराव न दिल्याने ठिक-ठिकाणी रस्त्याची साईड पट्टी खचल्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे हे चर सद्यस्थितीत अपघातास आमंत्रण देत आहेत.त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी येथील स्थानिक मधून होत आहे.

0

4