उभादंडा-सुखटणकरवाडीत घराच्या भिंती कोसळल्या…

2

वेंगुर्ला, ता.०४: तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून उभादंडा-सुखटणकरवाडी येथील अरुण आरोलकर यांच्या राहत्या घराच्या भिंती कोसळल्याने त्यांचे सुमारे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले आहे.
सुखटणकरवाडी येथील अरुण आरोलकर यांच्या घराला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. सुदैवाने त्यावेळी घरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान घराच्या भिंती कोसळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. यावेळी सरपंच देवेंद्र डीचोलकर, सदस्य आशु फर्नांडिस तसेच दिनेश तिरोडकर, तुषार साळगावकर, सुमित मांजरेकर, ऍलेस्टेर ब्रिटो, नगरसेवक राजेश कांबळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

3

4