कुडाळ, ता.४ : गोठोस येथील जिल्हा परिषद शाळा नं १ ची विध्यार्थीनी विद्या बांदेकर हिने डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम प्राज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याबद्दल गोठोस सरपंच डिगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.७ जुलै २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या डॉ ए पी जे अब्दुल कलाम प्रज्ञा शोध परीक्षेत इयत्ता सातवी शिकत असलेली विद्यार्थिनी विद्या बांदेकर हीने तालुक्यात प्रथम व जिल्ह्यात पाचवी (२४२ गुण,८०:६६%) गुण घेऊन यश संपादन केले. सर्वच या यशाबद्दल सर्व स्तरावरून विद्यार्थिनीचे व शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या वतीने कौतुक करण्यात आले. तिच्या या यशाबद्दल वर्गशिक्षक श्री तावडे गुरुजी यांचा मोलाचा वाटा आहे. सौ सरपंच डीगे(मॅडम )यानी शाळेतील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना पुढील वर्षी असेच यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. यावेळी केंद्रप्रमुख श्री तळवणेकर सर ,श्री काशीद सर ,सावंन मॅडम , खरात सर तसेच गावातील ग्रामस्थ श्री संतोष बांदेकर ,विलास नाईक वाळके मॅडम ,महादेव नाईक, अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
गोठोस जि. प.शाळा नं १ ची विध्यार्थीनी विद्या बांदेकर हीचा सरपंचाच्या हस्ते सत्कार
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES