अध्यक्षपदी जय भोसले तर कार्याध्यक्ष पदी सीताराम गावडे
सावंतवाडी,ता. ४ : सिंधुदुर्ग जिल्हा मिडिया पत्रकार संघाची नवनिर्वाचित कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्हा मिडिया पत्रकार संघाचा अध्यक्षपदी सिंधुदुर्ग माझा संपादक जय भोसले यांची तर कार्याध्यक्षपदी कोकण लाईव्ह ब्रेकींग संपादक तथा जेष्ठ पत्रकार सीताराम गावडे,उपाध्यक्षपदी कोकणचा तडाखाचे आबा खवणेकर,लोकसंवाद न्यूज संपादक समिल जळवी,प्रमोद गवस यांची निवड करण्यात आली. सचिवपदी कृष्णा सावंत तर सहसचिव पदी अँड.सिद्धीका भांडये तर खजिनदार पदी समर्थ न्यूज संपादक विष्णू धावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सल्लागार म्हणून राजेश नाईक व शिरीष नाईक यांची निवड करण्यात आली.यावेळी सदस्य म्हणून शैलेश मयेकर,भूषण सावंत,अमिता मठकर,विशाल पित्रे,आपा राणे,सुमित दळवी प्रसन्न गोंधवळे आनंद कांडरकर, अनिता मठकर,शैलेश मयेकर,अॅड.सिधिका भांडये,बाळा राणे,लवू परब,प्रशांत गवस,गोविंद शिरसाट यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया संपादक व प्रतिनिधी उपस्थित होते.