जिल्ह्यातील विद्यार्थी अधिकारी बनण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार…

2

दीपक केसरकर ; बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीला आज भेट…

सावंतवाडी ता.०४: मराठी माणूस अधिकारी  बनला पाहिजे हे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते.ते स्वप्न जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने सत्यात उतरताना आनंद होत आहे.या ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षणाला एक वेगळी दिशा मिळेल व येथील सुशिक्षितांचा बेरोजगारीचा प्रश्‍न सुटेल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.जम्प नेटवर्क आणि स्ट्रीम कास्ट यांच्या माध्यमातून येथील जिमखाना मैदानावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनी सेंटरला श्री.केसरकर यांनी भेट दिली.यावेळी ते बोलत होते.यावेळी मानसिंग पवार,विजय कोरगावकर,अंकुश नार,संदीप नाटलेकर आदी उपस्थित होते.
बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना यूपीएससी,एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.यासाठी जिल्ह्यातील ६७०  विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत.त्यातील निवड दीडशे विद्यार्थ्यांना हे विनामूल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.त्याची निवड प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे,तर ८० विद्यार्थ्यांचे गट करून ही निवड प्रक्रिया या पुढे सुरू राहणार आहे,अशी माहिती स्ट्रीम कास्ट कंपनीचे प्रमुख हर्षवर्धन साबळे यांनी दिली.श्री.साबळे पुढे म्हणाले आज झालेल्या मुसळधार पावसामुळे काही विद्यार्थ्यांना या निवड चाचणीला येता आले नाही,अशा विद्यार्थ्यांची पुढच्या रविवारी ही चाचणी घेतली जाणार आहे.

4