असनिये परिसरात बागायती व शेतमांगराचे नुकसान
ओटवणे,ता.४ :
तालुक्याच्या दुर्गम भागातील घारपी गावाला रविवारी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला.घारपीसह असनिये परिसरात वादळी वारा व मुसळधार पावसाने बागायती व शेतमांगराचे नुकसान झाले.मुसळधार पावसाने ओटवणे दशक्रोशीतील जनजीवन विस्कळीत झाले.बांदा-आंबोली राज्य मार्गावरील सरमळे पूल बराचवेळ पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
रविवारी दिवसभर अविरतपणे पाऊस कोसळत आहे.रविवारी सह्याद्रीच्या पट्ट्यात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याचा जोर होता. वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका घारपी गावाला बसला.वाऱ्याने अनेकांच्या शेतमांगरांचे पत्रे उडून गेले. घारपी घेरा येथे महेश ठिकार यांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने त्यांचे हजारोंचे नूकसान झाले.घारपी,असनियेत तुफान वारा व पावसामुळे माड-फोफळींच्या बागायतीचे नुकसान झाले.या परिसरात गेले दोन दिवस वीज पुरवठाही खंडित आहे.ओटवणे दशक्रोशीतील वीज पुरवठाहि गेले दोन दिवस खंडित आहे.