शाबासकी मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या आयुष्याचा केला माथेरा

175
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पुष्पसेन सावंत; पालकमंत्र्यांनी लक्ष न दिल्यास धरणे आंदोलन

वैभववाडी,ता.४ : आधी पुनर्वसन मगच धरण’ हे शासनाचे धोरण असताना शासनाने नेमलेल्या जबाबदार मंडळीकडून आपणाला शाबासकी मिळावी, यासाठी या अधिकाऱ्यांनी बुडीत क्षेत्रात येणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा माथेरा केला असल्याचा आरोप माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी केला.
वैभववाडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे, माजी सरपंच सुरेश नागप, प्रकाश सावंत, अजय नागप आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी. आमदार सावंत म्हणाले, नव्याने मोठा प्रकल्प होत असताना ९० टक्के प्रकल्पग्रस्तावर अन्याय होत आहे. लोकांनी दिलेला लोकप्रतिनिधी बोलत नाही. कोणी मदतीला जात नाही. प्रकल्पस्थळी खासदारांसह नेते मंडळी जावून आले.
पुनर्वसन केले नाही, नुकसान भरपाई नाही. या सर्व गोष्टी बासनात गुंडाळल्या आहेत. ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ मात्र त्याची पुर्तता झाली नाही. ‘आधी धरण मगच पुनर्वसन’ याला जबाबदार शासनाने नेमलेल्या जबाबदार मंडळीकडून अधिकाऱ्यांना शाबासकी मिळावी यासाठी या अधिकाऱ्यांनी बुडीत क्षेत्रात येणाऱ्या लोकांच्या आयुष्याचा माथेरा केला.
शासकीय अधिकारी बेजबाबदार काम का करतात? याप्रकरणी आपण पालकमंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन आपदग्रस्त बुडीत क्षेत्रात बुडत आहेत. त्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा ऐका. अन्यथा स्वातंत्र्यदिनी अर्ध नग्न मोर्चा काढणार आहोत. असा इशारा देत या मोर्चाचे नेतृत्व आपणच करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
घळभरणी वेळीच उठाव करायला हवा होता. मात्र ती वेळ निघून गेली आहे. आपण अन्यायग्रस्तांना चांगला वकील देवून कोर्टात न्याय मागणार आहोत. असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.

\