Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशहरातील अंडरग्राउंड वीज वाहिन्यांचा मार्ग मोकळा...

शहरातील अंडरग्राउंड वीज वाहिन्यांचा मार्ग मोकळा…

बैठकीत निर्णय; चतुर्थीनंतर कामाला होणार प्रत्यक्षात सुरुवात…

सावंतवाडी ता.०४: शहरातील अनियंत्रित विद्युत पुरवठा लक्षात घेता या ठिकाणी अंडरग्राउंड विज लाईन टाकणे गरजेचे आहे.त्यासाठी हे काम गणेश चतुर्थी नंतर सुरू करण्यात यावे,अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे विद्युत अधिकाऱ्यांना दिली.तर यासाठी आवश्यक असलेला निधी मी लवकरात-लवकर उपलब्ध करून देईन असे आश्वासनही श्री.केसरकर यांनी यावेळी बोलताना दिले.सावंतवाडी तालुक्यातील विजेच्या प्रश्‍नावर आज विज अधिकार्‍याची बैठक येथील पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते बोलत होते.
श्री.केसरकर पुढें म्हणाले,तालुक्यातील विजेच्या प्रश्‍नासोबत शहरातील रेंगाळलेली विविध कामे सुद्धा मार्गी लागणे गरजेचे आहे.त्यासाठी अशी कामे तात्काळ सुरू करण्यात यावी अशा सूचनाही त्यांनी उपस्थितांना केल्या.यावेळी विज वितरणचे कार्यकारी अभिंयंता कैलास लव्हेकर,सावंतवाडीचे उपअभियंता भालचंद्र कुलकर्णी,नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी वीज वितरणच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करतांना सर्व समस्या श्री.केसरकर यांच्यासमोर मांडल्या,जनतेचा प्रश्‍न सोडवितांना वेळोवेळी पाठपुरावा करूनही अधिकारी काम करत नाहीत,असे सांगत पालिकेची अनेक कामे आज अशा अधिकार्‍यामुळे खोंळबलेली असल्याचे निर्दशनास आणुन दिले.विजेचा लंपडावामुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी नगसेवक सुरेंद बांदेकर,बाबू कुडतरकर,शुभांगी सुकि,दिपाली सावंत, माधुरी वाडकर, भारती मोरे, अ‍ॅड निता सावंत आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments