वडाचापाट गावात स्वाभिमानला धक्का…

2

सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश…

मालवण, ता. ४ : पोईप विभागातील जनसंवाद अभियानादरम्यान वडाचापाट गावातील सरपंच नमिता कासले उपसरपंच श्रीकृष्ण पाटकर व सदस्यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे स्वाभिमानला मोठा धक्का बसला आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या जनसंवाद अभियानाला सर्वत्र उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. माणगाव, आब्रड व तेंडोली विभागातून हे अभियान आज पोईप विभागात दाखल झाले. या अभियानादरम्यान वडाचापाट सरपंच, उपसरपंच, सदस्यांनी आम. नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे वडाचापाट विभागात स्वाभिमानला मोठे खिंडार पडले आहे.

17

4