गत निवडणुकीप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीतही जनतेने शिवसेनेच्या पाठीशी राहावे…

173
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आम. वैभव नाईक : पोईप विभागात जनसंवाद अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद...

मालवण, ता. ४ : कुडाळ मालवण मतदार संघातील यापूर्वीच्या आमदारांनी विकासकामांची, रोजगाराची केवळ स्वप्ने दाखवली. मात्र या मतदार संघाचा आमदार म्हणून काम करताना मी प्रत्येक गावाला विकासाच्या दृष्टीने न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना जनतेला अपेक्षित असणारा विकास सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करत आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर व आपल्या माध्यमातून जिल्ह्यात प्रत्येक गावात भरघोस निधी उपलब्ध होऊन अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे गत निवडणुकीप्रमाणे जनतेने शिवसेनेवर विश्वास कायम ठेवत आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीशी राहावे असे आवाहन आम. वैभव नाईक यांनी जनसंवाद अभियाना दरम्यान केले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी १ ऑगस्टपासून सुरू केलेल्या जनसंवाद अभियान अंतर्गत आज तालुक्यातील पोईप विभागात पोचले. यामध्ये हेदूळ, खोटले, वायंगवडे, डीकवल, सुकळवाड, तिरवडे, नांदोस, पोईप, मसदे- चुनवरे, विरण बाजारपेठ, परबवाडी, वडाचापाट- पाटकरवाडी, गोळवण, चाफेखोल, कुणकवळे, आमडोस आदी गावांत बैठका घेत ग्रामस्थ व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी जि. प.सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक, उपतालुकाप्रमुख बाळ महभोज, सौ. श्वेता सावंत, देवयानी वरसकर, नंदू गावडे आदी व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थानी आपल्या विविध समस्या व प्रश्न आम. नाईक यांच्या समोर मांडले.
आम. नाईक म्हणाले, शिवसेना भाजप युती सरकारच्या गेल्या पाच वर्षात सरकारने शेतकरी सन्मान योजना, पीक विमा, उज्वला गॅस योजना, घरकुल योजना आदी अनेक योजनेद्वारे सर्वसामान्य जनतेचा विकास साधण्याचा प्रयत्न केला. तसेच युती सरकारच्या काळातच मुंबई- गोवा महामार्ग, चिपी विमानतळ आदी महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येत आहेत. शिवसेना जनतेला अपेक्षित असणारा विकास सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच जनतेने पुन्हा एकदा शिवसेनेला साथ द्यावी. शिवसेना कार्यकर्त्यांनी गावागावात, वाडीवाडीत पोचून शिवसेनेची विकासकामे जनतेपर्यंत पोहचवावीत. तसेच जनतेच्या समस्या जाणून घ्याव्यात, या समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे असेही आम. नाईक म्हणाले.
यावेळी जान्हवी सावंत यांनी जनसंवाद अभियानातून आम्ही प्रत्येक गावात, वाडीवाडीत पोहचून ग्रामस्थांचे प्रश्न जाणून घेत आहोत. याद्वारे ग्रामस्थांना थेट आमदारांकडे प्रश्न, समस्या मांडणे शक्य होत असून आमदार व शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडविण्यास प्रयत्नशील आहोत. मागील निवडणुकीत ज्याप्रकारे वैभव नाईक यांच्या विश्वास दाखवून त्यांना निवडून दिलात तसे आगामी विधानसभा निवडणुकीतही आम. नाईक यांना भरघोस मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, आधीच्या आमदारांनी जेवढा निधी गावांना दिला नसेल त्यापेक्षा जास्त निधी आमदार वैभव नाईक यांनी गेल्या पाच वर्षात दिला आहे. आम. नाईक, खास. विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला भरघोस निधी देण्यात आला असून प्रत्येक गावातील ग्रामस्थ व शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणी पैकी ७० टक्के विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. आम. नाईक हे जनतेत मिसळून जनतेसाठी काम करणारे आमदार असून आगामी निवडणुकीत जनतेने त्यांना साथ द्यावी, असेही खोबरेकर म्हणाले.

\