किंगमेकर मधील ‘किंग’ शिवसेनेत दाखल…

468
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नरेश हुलेंसह शेकडो कार्यकर्त्यांचा आम. नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश ; माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना मोठा धक्का…

मालवण, ता. ४ : माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे नरेश हुले यांनी आपल्या असंख्य सहकार्‍यांसह आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन हाती बांधले. शिवसेनेत श्री. हुले यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. मेढा भागाच्या विकासासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील. मेढ्यात काहीजण स्वतःला किंगमेकर समजत होते. मात्र श्री. हुले यांच्यामुळे किंगमेकर मधील किंगच शिवसेनेत दाखल झाला आहे. असा टोला लगावत यापुढील काळात मेढ्यात शिवसेनेच्या विजयाचा रथ पुढे नेऊ असा विश्‍वास आमदार नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
माजी नगराध्यक्ष आचरेकर यांचे समर्थक असलेल्या नरेश हुले यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने आचरेकर यांना मेढा प्रभागात मोठा धक्का बसला आहे. प्रवेशानंतर श्री. हुले यांनी आपल्या प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी आणि युवा वर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने दिलेला शब्द पाळून मेढा भागातील रखडलेली विकासकामे मार्गी लावावीत असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी उपस्थित असलेल्या मित्रपरिवार आणि सहकार्‍यांना उद्देशून तुमच्यावतीने मी शिवबंधन बांधत असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आरोग्य सभापती पंकज सादये, कणकवली नगरसेवक सुशांत नाईक, बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, स्वप्नील आचरेकर, गणेश कुडाळकर, दीपा शिंदे, नीलम शिंदे, आकांक्षा शिरपुटे, नंदू गवंडी, किरण वाळके, प्रवीण रेवंडकर, महेश शिरपुटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
नरेश हुले यांच्यासमवेत संतोष तारी, योगेश मेस्त्री, बाळकुमार जोशी, नीतेश पेडणेकर, कोमित मालवणकर, दीपक तांडेल, विनायक परब, राजेश वाघ, सूर्यकांत कुमठेकर, रवींद्र केळुसकर, महेश्‍वर मोंडकर, मिलिंद मेथर, राजेश इब्रामपूरकर, शिवराम कोचरेकर, नितीन आढाव, बाळा आढाव, राजेश तारी, किशोर जोशी, विनोद प्रभू, विष्णू कुमठेकर, विशाल प्रभू, विश्राम जोशी, अंतोन डिसोझा, चंद्रकांत हुले, सत्यवान मसुरकर, ललित वाघ, यतीन मेतर, फन्च्यू फर्नांडिस, लीलाधर तारी, उमेश हुले, प्रदीप वाघ, प्रकाश पेडणेकर, यतीन केळुसकर, करण कुबल, उदय मोरजकर, अशोक जोगी, प्रसाद मोंडकर, दतू कुमठेकर, आशिष जोगी, लीलाधर आचरेकर, जावेद पटेल, नीलेश हुले, विश्‍वास कुमठेकर, संदीप तांडेल, चंद्रकांत पारकर, जितेश वाघ, राजेश आढाव, राकेश हुले, अब्दुलगणी मुकादम, विल्सन डिसोझा, विकी चोपडेकर, राजू पराडकर, सर्वेश पराडकर, ओंकार पांगे यांच्यासह बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

\