मालवणातील बँक कर्मचा-याला मुंबई पोलिसांकडून अटक ..

11
2
Google search engine
Google search engine
Google search engine

गुन्हे शाखेची कारवाई ; अंमली पदार्थ बाळगल्यासह फसवणूकीचा आरोप

मालवण,ता.२४ : मुंबई येथील एका गुन्ह्यात अंमली पदार्थ बाळगणे, फसवणूक याप्रकरणी येथील राजेश दामोदर बोभाटे याला मुंबई गुन्हा अन्वेषण शाखा दहाच्या पथकाने ताब्यात घेत येथून मुंबईला नेले. संशयित हा शहरातील एका बँकेचा कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. अंमली पदार्थ बाळगणे तसेच फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखा १० येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्यात आज येथे दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस कर्मचारी श्री. धारगळकर,श्री.खेडेकर हे येथे दाखल झाले. त्यांनी संशयित आरोपी राजेश बोभाटे याला ताब्यात घेतले. त्यानंतर ते मुंबई येथे रवाना झाले.

\