Saturday, December 14, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा आळवाडी बाजारपेठेतील दुकानावर चिंचेचे झाड पडून लाखोंंचे नुकसान

बांदा आळवाडी बाजारपेठेतील दुकानावर चिंचेचे झाड पडून लाखोंंचे नुकसान

बांदा,ता. ४ : बांदा शहरातील आळवाडी बाजारपेठेतील चौघा व्यापाऱ्यांच्या दुकानावर चिंचेचे भले मोठे झाड पडल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सायंकाळी उशिरा घडली. झाड कोसळताना व्यापाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
स्थानिक ग्रामस्थांनी लागलीच धाव घेत मदतकार्य केले. यामध्ये महेश तळवणेकर यांच्या चिकन सेंटरचे, नितीन शारबीद्रे यांचे चिकन सेंटर, प्रकाश राऊत यांचे लोहार दुकान, शिवराम सौदेकर यांच्या दुकानाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
हे झाड जीर्ण झाल्याने मुसळधार पावसाने उन्मळून पडले. याठिकाणी चिकन सेंटरची संख्या ही अधिक आहे. झाड कोसळल्याने दुकाने जमीनदोस्त झाली. त्यामुळे दुकानातील अनेक कोंबड्या मृत झाल्याने दुकानदारांना मोठ्या नुकसानिस सामोरे जावे लागले.
बांदा शहर व परिसराला आज मुसळधार पावसाने झोडपून काढले. स्थानिक ग्रामस्थ ऋषि हरमलकर, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, शैलेश केसरकर, मंदार धामापूरकर, बाबलो धामापूरकर, राजा खान, विशाल आळवे, हनुमंत आळवे, अण्णा आळवे यांनी धाव घेत झाड हटविण्यास मदत केली. सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्यात न आल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments