गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजना पोहचविण्याचे काम शिवसैनिकांनी करावे

198
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर:वेंगुर्लेत शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न

वेंगुर्ले.ता,४: कोणतीही योजना अस्तित्वात येण्यासाठी बराच काळ जातो. परंतु एखादी योजना अस्तित्वात आल्यानंतर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि आपण आणलेल्या योजना प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहचविण्याचे काम शिवसैनिकांनी केले पाहिजे. तरच जनता आपल्या पाठीशी ठाम पणे उभी राहणार आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ला येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.
वेंगुर्ला तालुका शिवसेना यांच्यावतीने रविवारी वेंगुर्ला येथे कार्यकर्ता मेळावा व शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या जाहिर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री यांच्या हस्ते शिवसेनेचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख संजय पडते व वेंगुर्ला तालुका नवनिर्वाचित तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, सभापती सुनील मोरजकर, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडस्कर, सचिन देसाई, अजित सावंत, जिल्हापरिषद सदस्य नितीन शिरोडकर, सुनील म्हापणकर, पंचायत समिती सदस्य अनुश्री कांबळी, प्रणाली बंगे, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक सुमन निकम, तुषार सापळे, संदेश निकम, उपतालुका प्रमुख संजय गावडे, शहर प्रमुख विवेक आरोलकर, तालुका महिला संघटक सुकन्या नरसुले, शहर महिला संघटक मंजुषा आरोलकर, जिल्हा बँक संचालक राजन गावडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील डुबळे, माजी सभापती सुचिता वजराटकर, अतुल बंगे, सुशील चिंदरकर, माजी नगरसेविका श्वेता हुले आदी उपस्थित होते.
मागील २५ वर्षाचा हिशोब करा पण मि मंत्री झाल्यानंतर ५ वर्षात सिंधुदुर्गात जो निधी आणला एवढा निधी कोणत्याही पक्षाच्या नेत्याने आणला नाही. चांदा ते बांदा योजनेतील ३२५ कोटी जनतेपर्यंत पोहचले पाहिजे. रापण संघांना ७५ टक्के अनुदानावर जाळ्या देण्यात येणार आहेत. आतापर्यंत २०० बोट धारकांना आउट बोट इंजिन देण्यात आले आहेत. जो कोकणी माणूस आपल्या मागे उभा राहिला त्याच्या घरात समृद्धी आली पाहिजे हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून आपण आणलेल्या प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत. लोकांना लाचार बनायला शिकवू नका स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवा शिवसैनिक स्वतःच्या बळावर मोठा झाला. प्रसंगी वडा पाव खाऊन लोकांसाठी काम करणारा तो शिवसैनिक. शिवसेनेची शिस्त सर्वानीच पाळली पाहिजे येथे पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. पक्ष जबाबदारी देईल ती पार पाडणे गरजेचे आहे. तुम्ही फक्त लोकांपर्यंत जा आपण या जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही. असेही यावेळी पालकमंत्री म्हणाले. शिवसेनेत काम करत असताना पदाच्या मागे धावू नका. काम करत रहा पद तुम्हाला आपोआप मिळेल. जिल्हा परिषदेत यापूर्वी कोणत्याच नेत्याने एवढा निधी आणला नाही जेवढा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आणला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९९५ सालात जी शिवसेना होती ती पुन्हा उभी करिन असे प्रतिपादन नूतन जिल्हाध्यक्ष संजय पडते यांनी केले.
मी एक सेनेचा सामान्य कार्यकर्ता असून पक्ष श्रेष्ठींनी माझ्यावर दिलेली तालुकाप्रमुख पदाची जबाबदारि सर्वांच्या मार्गदर्शनाने पार पडून तालुक्यात पक्ष संघटना अधिकच मजबूत करेन असे यावेळी बाळू परब यांनी सांगितले तर मी शिवसेनेशिवाय कोणत्याही पक्षाचे काम करणार नाही. त्यामुळे मला गृहीत धरू नका. एकदा चूक केली ती चूक पुन्हा करणार नाही. संजय पडते यांचे काम कौतुकास्पद आहे. दीपक केसरकर यांच्या विरोधात उभे राहणाऱ्यांना चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन माजी आमदार शंकर कांबळी यांनी केले.

\