तात्काळ पूर्ववत करा अन्यथा आंदोलन : उपसरपंच सदा राणे
बांदा, ता. ५ : इन्सुली पंचक्रोशीत गेले पाच ते सहा दिवस बीएसएनएलची “रेंज” गायब झाली आहे.त्यामुळे परिसरातील ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
याबाबत इन्सुलीचे उपसरपंच सदा राणे यांनी नाराजी व्यक्त केली असून, तात्काळ नवीन पूर्ववत होण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा सर्व ग्रामस्थांना घेऊन कार्यालया समोर धरणे आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
गावात गेले चार ते पाच दिवस रेंजची समस्या आहे.अन्य खाजगी मोबाईलची सेवा सुरळीत मात्र बीएसएनएलची सेवा खंडित झाली आहे. वारंवार अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सुद्धा दुर्लक्ष केले जात आहेत त्यामुळे यावर योग्य तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा राणे यांनी दिला आहे.