भुईबावडा बाजारपेठेत वडाचे झाड कोसळले

333
2

तब्बल तीन तास वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा; उशिरा वाहतूक पूर्ववत

वैभववाडी,ता.५ : सोमवारी पहाटे झालेल्या जोरदार वादळी पावसाने भुईबावडा बाजारपेठेतील होळीचा मांड नजिक असलेले जुनाट वडाचे झाड उन्मळून कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प होती. उशिरा सा. बा. ने जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला हटवून वाहतूक पूर्ववत केली.
गगनबावडा खारेपाटण राज्यमार्गावर भुईबावडा बाजारपेठेत सोमवारी पहाटे झालेल्या जोरदार वादळी पावसाने जुनाट वडाचे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वडाचे झाड बाजूलाच असणाऱ्या विद्युत वाहिण्यांवर पडल्यामुळे विद्युत वाहिण्या व एक पोल मोडून पडला आहे.
भुईबावडा बाजारपेठ मध्यवर्ती ठिकाण असल्याने या मार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. शेकडो प्रवाशांची या मार्गावरून ये-जा सुरू असते. पहाटे झाड उन्मळून कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान सा. बा. ने जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.

4