2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
कुडाळ,ता.५ : कुडाळ-मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या स्वखर्चातून माणगाव येथील ग्रामस्थांना ताडपत्री वाटप केले. माणगाव शिवसेना शाखेमध्ये पंचायत समिती सदस्य शरयू घाडी यांच्या हस्ते या ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. आमदार वैभव नाईक यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामांचा धूम धडाका लावला आहे. माणगावमध्ये पाचशे ताडपत्री देऊन मतदार राजाला त्यांनी खुश केले. या ताडपत्री वाटपाने गावामधून कौतुक केले जात आहे. यावेळी आप्पा मुंज, साई नार्वेकर, शैलेश विर्नोडकर, सुनील सावंत, लक्ष्मण तेली, श्री धुरी आदी ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4