बांदा-आळवाडी बाजारपेठ जलमय

2

बांदा,ता.५ शहराला मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल नदीचे पुराचे पाणी आळवाडी बाजारपेठेत शिरले आहे. पाण्याचा वेग सातत्याने वाढत असून आळवाडी बाजारपेठेतील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बाजारपेठेतील कित्येक दुकाने व मच्छीमार्केट पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.
आळवाडीतील संपूर्ण बाजारपेठेत पाणी शिरल्याने बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. मुसळधार पाऊस सुरूच असल्याने यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बांदा-दाणोली रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. शेर्ले येथील जुने कापई पूल देखील पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे.

4