चाकूने भोसकले : शेजाऱ्यांच्या समोरच घडला थरार
दोडामार्ग/ सुमित दळवी,ता. ०५ : बायको माहेरी गेल्याच्या रागातून पतीनेच पत्नीला चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार दोडामार्ग तांदुळवाडी येथे घडला आहे.
ही घटना आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. नम्रता ज्ञानेश्वर पेडणेकर (वय ४०) असे मृत महिलेचे नाव आहे। तर याप्रकरणी पती ज्ञानेश्वर देऊ पेडणेकर (वय ४८ )याला दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हा सर्व प्रकार मध्यधुंद अवस्थेत केल्याची कबुली देऊन त्याने पोलिसांना दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की यातील मृत्यू नम्रता व पती ज्ञानेश्वर यांचे दारू या विषयावरून जोरदार वाद होत होते दरम्यान दोन दिवसापूर्वी ती रागाने माहेरी गेली होती काल सायंकाळी उशिरा ती घरी आली. यावेळी सकाळी ती माहेरी गेल्याच्या रागातून ज्ञानेश्वर यांनी आपल्या पत्नीचे भांडण उरकून काढले,तिला जोरदार मारहाण केली. यावेळी दोघांत शाब्दिक वाद झाले. या वादात राग सहन न झाल्यामुळे ज्ञानेश्वर याने चाकू घेवून तिचा पाठलाग केला व घराच्या अंगणात खाली पाडुन बायकोच्या पोटात तब्बल दोन वेळा चाकूने वार केले. तसेच ती घरात आल्यानंतर पुन्हा तिच्या डोक्यात दोन वार केले. या परिस्थितीत तिच्या गंभीर जखमा झाल्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला. हा प्रकार ग्रामस्थांच्या समोर घडला .मात्र पती ज्ञानेश्वर यांच्या हातात चाकू असल्यामुळे त्याला कोणीच प्रतिकार करू शकले नाहीत त्यामुळे उपचारापूर्वीच नम्रता यांचे जागीच निधन झाले. याची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस निरीक्षक सुनील थोपटे त्यांचे सहकारी रामचंद्र मळगावकर, अनिल पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुजित घाडगे व श्री माने हे घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.