वागदे अपघातामधील दोघा गंभीर रुग्णांना गोव्यात हलवले

11
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दहा जणांवर जिल्‍हा रूग्‍णालयाात तर उर्वरीत रूग्‍णांवर कणकवलीत उपचार सुरू

कणकवली, ता.०२ : मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथील अपघातात जखमी झालेल्‍या दोघा गंभीर जखमी रूग्‍णांना गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. तर दहा गंभीर रूग्‍णांवर ओरोस जिल्‍हा रूग्‍णालय आणि उर्वरीत रूग्‍णांवर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. दरम्‍यान टेम्‍पो चालकाची चौकशी कणकवली पोलीस करत आहेत.
कुडाळ येथे लग्‍न सोहळा आटोपून पाटगाव (ता.देवगड) येथील ४५ जण कुडाळ ते पाटगाव असा प्रवास करत असताना वागदे येथे टेम्‍पो अपघातग्रस्त झाला होता. अपघातानंतर सर्व जखमींना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयत हलविण्यात अाले. त्‍यानंतर तातडीने कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर. जे. पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी रुग्णाची विचारपूस केली.
अपघातातील गंभीर जखमींमध्ये अनंत धोंडू गुरव (वय ५५), मनीषा महेश गुरव (वय ३०), मनीषा रवींद्र गुरव (वय४६), सुनीता शिवाजी गुरव (वय १७), सचिन सदाशिव गुरव (वय ३०), प्रणिता विष्‍णु गुरव (वय ५०), रोशनी रमेश राघव (वय २३), संजना संदीप गुरव (वय २०), विजया विजय गुरव (वय ५०), अनिता सुरेश गुरव (वय ५०), चिराग विनोद गुरव (वय १२), विष्णू वामन गुरव (वय ५२) यांचा समावेश आहे. या सर्वांवर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार करून नंतर ओरोस येथील जिल्‍हा रूग्‍णालयात हलविण्यात आले आहे. तर यातील दोघांची प्रकृती आणखी खालावल्‍याने त्‍यांना सायंकाळी उशिरा गोवा बांबुळी येथील रूग्‍णालयात हलविण्यात आले आहे.
इतर जखमींवर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. त्‍यामध्ये तेजा सुहास गुरव (वय १२), सुचिता रामा गुरव (वय ५५), सानिका संतोष गुरव (वय ३०), विजय शांताराम गुरव (वय ४५), दक्ष दिनेश गुरव (वय १६), संजीवनी संदीप गुरव, अनिता लक्ष्मण गुरव, जयश्री नारायण गुरव (वय ६०), सुषमा दीपक गुरव (वय ५५), अस्मी शिवाजी गुरव (वय १२), विजय वसंत गुरव (वय ४०), संस्कार तुकाराम गुरव (वय १८), आरोही रवींद्र गुरव (वय १०), शिवानी शिवाजी गुरव (वय ४०), रूपाली रामचंद्र गुरव (वय ४०), बाबला सखाराम गुरव (वय ६५), सुविधा बाबला गुरव (वय ६०), अस्मिता अजय गुरव (वय ४०), मानसी सुहास गुरव (वय १९), सचिन वसंत गुरव (वय ४३), महेश गुरव (वय ४०), पार्थ जितेंद्र गुरव (वय ९),कलावती काशिराम गुरव (वय ५१), प्रियांका रामचंद्र गुरव (वय २२),सविता बाबुराव गुरव (वय ६०), स्मिता गुरव, सिद्धेश गुरव (वय २५), अनिता विजय गुरव (वय ५५), तेजस्वी गुरव (वय १३) आणि चालक गुरूनाथ काशिराम गुरव (वय २७) यांचा समावेश आहे.

खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, संजना सावंत यांची रुग्णालयात धाव…!
रुग्णाच्या मदतीसाठी रुग्णालयात शिवसेना खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा संजना सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, वागदे सरपंच संदीप सावंत, शहराध्यक्ष अण्णा कोदे, राकेश परब तसेच अमोल गोसावी, रंजन राणे शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, नीलम सावंत, सचिन सावंत, तेजस राणे आदी शिवसेना (उद्धद बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कार्यकर्ते आले होते. भीषण अपघातात जखमींना उपचारासाठी डॉ. बी. जी. शेळके, डॉ. मिलिंद म्हसकर, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. प्रतिभा नाटेकर, डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. सुहास पावसकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. संतोष चौगुले, डॉ. किर्लोस्कर, डॉ. धनंजय रासम आदींनी परिश्रम घेतले.

\