अतिउत्साही पर्यटकांची कार नदीत गेली वाहून…

482
2

आंबोली येथील घटना:सुदैवाने जीवितहानी नाही,गाडीचे नुकसान…

आंबोली ता.०५: वर्षा पर्यटनासाठी बेळगावहून आंबोलीत आलेल्या अतिउत्साही पर्यटकांची कार येथील कावळेसाद पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे.ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान उशिरा नंतर ही कार जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली.मात्र यात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,गेले काही दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील हिरण्यकेशी नदीला पूर आला आहे.हे पुराचे पाणी आज अति प्रवाहाने कावळे साद पुलावरून वाहत होते.दरम्यान बेळगाव वरून काही पर्यटक वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आले असता त्यांनी अतिउत्साहात पुराच्या पाण्यातून कार बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यांची कार पाण्यातून वाहू लागली,हे लक्षात येताच आतील चार ते पाच जणांनी गाडीतून बाहेर उतरत तेथून पळ काढला.मात्र गाडी प्रवाहाबरोबर वाहून गेली.दरम्यान अथक परिश्रमानंतर जेसीबीच्या सहाय्याने ही कार बाहेर काढण्यास यश आले.

4