कणकवली, ता.५ : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मुंबईकर चाकरमान्यांना यावर्षीसुद्धा २८ ते ३१ ऑगस्ट या काळात मुंबईतून कोकणात येण्यासाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
फक्त १०० रुपयात बुकिंग करून या गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.याचा फायदा चाकरमानी घ्यावा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.त्यांनी ब्रेकिंग मालवणीशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.
ते म्हणाले दरवर्षी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येते. दादर, मीरा-भाईंदर,बोरिवली, कळवा, ठाणे,डोंबिवली आदी परिसरातून ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी २८ तारखेला १० बसेस, २९ तारखेला २० बसेस, ३० तारखेला ३० बसेस, ३१ तारखेला ४० अशा बसेस कोकणाच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक असलेल्या चाकरमान्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आपली नावे नोंदवून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
चाकरमान्यांसाठी सोडणार आमदार नितेश राणे २८ ते ३१ तारखेला बसफेऱ्या
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES