दिलीप पांढरपट्टे:कोठेही पूर परिस्थिती नसल्यामुळे तूर्तास निर्णय नाही…
सिंधुदुर्गनगरी ता.०५: जिल्ह्यात मुसळधार पाऊस असला तरी सध्यस्थिती लक्षात घेता कोणत्याही ठिकाणी पूर परिस्थिती नाही त्यामुळे शाळांना सुटी देण्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.रत्नागिरी रायगड व अन्य ठिकाणी पूरपरिस्थिती आहे.त्यामुळे त्याठिकाणी सुट्टी दिली असावी,परंतु जिल्ह्यात अशा प्रकारे कोणताही प्रश्न नाही.त्यामुळे मुलांचे नुकसान नको म्हणून सुट्टीचा निर्णय नाही तशी परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा शिक्षणाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्यानंतर काय ते बघू असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे.अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर येण्याचा प्रकार घडला आहे.झाडे कोसळत आहे,या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देणार का ? असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.याबाबत श्री.पांढरपट्टे यांना विचारले असता,ते म्हणाले सध्या तरी तसा काही निर्णय नाही.त्यामुळे मुलांचे नुकसान नको म्हणून शाळांना सुट्टी देणार नाही तसा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडून आल्यानंतर विचार करू