सावंतवाडी शहरात अतिवृष्टीजन्य परिस्थिती…

507
2

पावसाचा जोर वाढला: काळजी घ्या,नगराध्यक्ष बबन साळगावकर…

सावंतवाडी ता .०५: गेले पाच ते सहा दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आज सायंकाळी कहर केला.सावंतवाडी शहरात मात्र अतिवृष्टी कोसळल्या सारखा पाऊस बरसत होता.दरम्यान नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.
आज सायंकाळी शहरात जोरदार पाऊस कोसळला यात अधून-मधून विजा व गडगडाट होत होता. सायंकाळी उशिरा पावसाचे प्रमाण वाढले.त्यामुळे शहरात रस्त्यावर कुणीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.तर ठिकाणी पाणी साचले आहे,काही धोकादायक झाडे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे योग्य ती काळजी घ्या असे आवाहन श्री साळगावकर यांनी केले आहे

4