कावळेसाद मारहाण प्रकरणातील संशयितांकडुन दागिने परत

2

जखमी मालवणचे युवक:संशयितांच्या पत्नी-मुलांची सावंतवाडी पोलिसात धाव

सावंतवाडी,ता. ५ : आंबोली कावळेसाद येथे मालवण येथील पाच युवकांना मारहाण करणाऱ्या बेळगावातील त्या पर्यटकांनी अखेर शरणागती पत्करण्याचा निर्णय घेतला आहे.विशेष म्हणजे त्या संशयितांच्या घरातील महिलांनी आपल्या लहान मुलांसमवेत पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यात सात महिलांसह लहान मुलांचा समावेश होता.
दरम्यान त्या महिलां संशयितांनी पळवून नेलेले दागिने सावंतवाडी पोलीसांकडे दीले. यात तीन दागिन्यांचा समावेश आहे.याबाबतची माहिती या गुन्ह्याचे तपासीअंमलदार तथा पोलीस सहाय्यक निरीक्षक अमित गोते यांनी दिली.
त्या संशयित युवकाच्या घरातील महिलांनी आपल्या लहान मुलां समवेत आज येथील पोलीस ठाण्यात हजेरी लावली. यात काही दागिने त्यांनी परत केले आहेत असे सांगून गोते यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.दरम्यान पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांवर अटकेची कारवाई लवकरच करण्यात येणार आहे.त्या नातेवाईकाकडून संशयितांची नावे घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते त्यामुळे तपासात अडसर नको म्हणून पोलिसांनी माहिती देण्याचे टाळले.

4