माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचे मुख्याध्यापकांना आदेश…
सिंधुदुर्गनगरी ता.०५: अतिवृष्टीमुळे शाळेत येण्या-जाण्यास धोकादायक स्थिती असेल तर मुख्याध्यापकांनी स्थानिक पातळीवर सुट्टी देण्याचा योग्य तो निर्णय घ्यावा,असे आदेश सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सर्व मुख्याध्यापकांना दिले आहे.याबाबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी शाळांना सुट्टी देण्याबाबतचा निर्णय शिक्षणाधिकारी घेणार आहेत.सद्यस्थितीत पुर परिस्थिती नसल्यामुळे तूर्तास सुट्टीची गरज नाही असे त्यांनी जाहीर केले होते.याबाबतचे वृत्त ब्रेकिंग मालवणीने प्रसिद्ध करताच तात्काळ श्री.कडूस यांच्याकडून माहिती देण्यात आली.
यात त्यांनी सर्व खाजगी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना लेखी आदेश दिले आहेत.यात आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीमुळे शाळेत येण्या-जाण्यास धोकादायक स्थिती असेल तर स्थानिक पातळीवर शाळेत सुट्टी घेण्याबाबत स्थानिक भौगोलिक परिस्थिती पाहून त्या-त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी निर्णय घ्यावा,आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची दक्षता घेण्यात यावी,याबाबत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनाही आवश्यक सूचना द्याव्यात असे या पत्रात म्हटले आहे.