मालवणी संस्कृती-वारसा मंडळाच्यावतीने महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा

190
2
Google search engine
Google search engine
Google search engine

१४ ऑगस्टला आयोजन ; स्पर्धकांना आकर्षक पारितोषिके…

मालवण, ता. ५ : मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्यावतीने यावर्षीही नारळी पोर्णिमेनिमित्त १४ ऑगस्टला बंदर जेटी येथे सायंकाळी चार वाजता महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना सोन्याची नथनी आणि पैठणी तसेच चतुर्थ विजेत्या स्पर्धकास चांदीची पैंजण दिली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होणार्‍या व स्पर्धा पाहणार्‍या महिलांना कुपण दिले जाईल. त्या कुपणवरून लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक पारितोषिक दिले जाणार आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क अथवा वयाची अट नाही, नऊवारी साडी परिधान करून आल्यास खास भेट दिली जाणार आहे. स्पर्धकांना नारळ मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. अधिक माहिती व संपर्कासाठी मोबा (९८९२०५५८२०), गणेश पाडगावकर मोबा (९४२३२१४७४५) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केले आहे.

\