माजगाव फाॅरेस्ट कॉलनीत भरवस्तीत घुसला “बिबट्या”

2

सावंतवाडी, ता.५ : माजगाव गरड फॉरेस्ट कॉलनी परिसरात भला मोठा बिबटा भरवस्तीत घुसल्याचा प्रकार घडला.अनेक लोकांनी त्याला रस्त्यावर फिरताना पाहीले.ही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.याबाबतची माहिती सर्पमित्र नवीद हेरेकर यांनी दिली.
दरम्यान येथील मशीद परिसरात बिबट्याला रस्त्यावरून जाताना अनेकांनी पाहीले.मात्र लोकांची जाग लागताच तो बाजूच्या झुडपात पळून गेला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभाग कार्यालय याबाबतची माहिती देण्यात आली त्यांच्याकडून नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.

15

4