सावंतवाडीतील पाच युवकांना जम्मूतून माघारी पाठवले

1999
2

सावंतवाडी/ शुभम धुरी, ता. 6 जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर तेथील पर्यटकांना माघारी फिरण्याचे आदेश आर्मी कडून देण्यात आले होते.त्यात सावंतवाडीतील वकील राहुल पई यांच्यासह पाच युवकांचा समावेश आहे.
सद्यस्थितीत त्यांना जम्मू-काश्मीर येथून दिल्ली येथे वायुसेनेच्या विमानाने हलविण्यात आले आहे. ते सुरक्षित असून येत्या दोन दिवसात ते सावंतवाडीत दाखल होण्याची शक्यता आहे.यात पई यांच्यासह अक्षय देशपांडे ,योगेश पारकर ,अमोल सावळ,लक्ष्मण माळकर
सर्व सावंतवाडी आदींचा समावेश आहे.हे सर्वजण अमरनाथ यात्रेसाठी गेले होते. 2 तारखेला त्यांनी अमरनाथ येथे जाऊन दर्शन घेतले. मात्र त्याच संध्याकाळी त्यांना ते राहत असलेल्या हॉटेलवर आर्मीच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून माघारी परता अशी विनंती केली. त्यानंतर वायुसेनेच्या विमानाने त्यांना दिल्ली येथे सोडण्यात आले. आपण सुरक्षित आहोत अशी त्यांनी ब्रेकींग मालवणीला संपर्क साधून माहिती दिली आहे

4