राज्यमार्गावरील वाहतूक बंद:सुदैवाने पाच पोलिस कर्मचारी बचावले…
आंबोली ता,०६: दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानंतर रात्री झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे आंबोली घाटात तब्बल चार ठिकाणी मोठी झाडे कोसळली आहेत.त्यामुळे सावंतवाडी आंबोली रस्ता बंद झाला आहे.तर पडलेल्या झाडांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आंबोली पोलिसांच्या गाडी समोरच भलेमोठे झाड कोसळल्यामुळे त्यांची गाडी चिखलात अडकली,सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
गाडीत पाच पोलीस असल्याची माहिती तेथील नागरी उदय आंबोलकर यांनी दिली.आंबोली घाट दिवसेंदिवस धोकादायक होत आहे.त्यात चार ठिकाणी पहाटे झाडे कोसळल्यामुळे सद्यस्थितीत वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे.दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या आहेत.या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी हा थरार अनुभवला.