वेंगुर्लेत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने घराचे छप्पर उडाले…

2

आसोली गावातील घटना; लाखो रुपयांचे नुकसान…

वेंगुर्ले ता.०६: तालुक्‍यात आज वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे असोली जाधववाडी येथील आप्पा आसोलकर यांच्या घरावरील पत्र्याचे छप्पर पूर्णतः उडून गेल्याचा प्रकार घडला आहे.ही घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.यात छपरासह आतील सामान भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आज सकाळपासून तालुक्यात ठिक-ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.दरम्यान आज सकाळी आसोली गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.यात ठिकठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.तर या वाऱ्याचा वेग एवढा जास्त होता,की चक्क श्री.असोलकर यांच्या घराचे छप्पर पूर्णतः उडून गेले.मात्र या घरात कोणी वास्तव्यास नसल्याने जीवितहानी टळली.दरम्यान गावातील काही नागरिकांनी आतील साहित्य भिजू नये यासाठी मदत कार्य केले.

21

4