मुसळधार पावसामुळे कणकवली तालुका जलमय

266
2

अनेक गावातील एस.टी.बस बंद, कोल्हापूर, मुंबई मार्गावर परिणाम

कणकवली,ता.६ : कणकवली तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असून अनेक गावातील एस.टी.बसेस बंद झाल्या आहेत. तर वीज तारांवर झाडे कोसळल्याने अनेक गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे. सद्यस्थितीत कणकवली ते कोल्हापूर आणि मुंबईला जाणार्‍या मार्गावर पाणी असल्याने येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कणकवली बसस्थानकातून आज कोल्हापूर, पुणे, मुंबई मार्गावरील बसेस बंद आहेत.
मुसळधार पाऊस होत असला तरी फोंडाघाट सुरक्षित आहे. तर करूळ आणि भुईबावडा घाटमार्ग बंद झाले आहेत. आज सकाळपासूनच आचरा, सातरल, जानवली, नागवे, लोरे या मार्गावर पाणी आल्याने सर्वच वाहतूक सेवा ठप्प झाली आहे.

4