कणकवली,देवगड,वैभववाडी तहसीलदार यांना संपर्क साधून घेतला आढावा…
कणकवली ता.०६: तालुक्यातील खारेपाटण येथे निर्माण झालेल्या पुरस्थितीची आम.नितेश राणे यांनी गंभिर दखल घेतली आहे.या ठिकाणच्या जैनवाडीतील ग्रामस्थांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी इंजिन बोट आणि ती बोट चालविणारा तज्ज्ञ चालक उपलब्ध करून दिला आहे.
तहसीलदार आर.जे.पवार यांच्याशी संपर्क साधून आपत्कालीन परिस्थितीचा आढावा आम. नितेश राणे यांनी घेतला, तेव्हा जैनवाडीतील लोकांना पाण्याबाहेर आणण्यासाठी असलेली अपुरी यंत्रणा त्यांच्या लक्षात आली.धुवांधार पावसामुळे देवगड, वैभववाडी खारेपाटण या भागात पावसामुळे आपत्कालीन परिस्थिती निमार्ण झाली आहे काय याची माहिती त्या ठिकाणच्या तहसीलदारां कडून घेतली मदत कार्यसाठी आवश्यक यंत्रणा त्या तालुक्यांना उपलब्ध करून दिली आहे.
उंबर्डे येथे एक तरुण वाहून गेला असल्याने त्यांच्या शोधकार्यासाठी स्कुबा डायव्हिंगचे पथकही पाठविले आहे. स्वाभिमान पक्षाच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशीही आम.नितेश राणे यांनी संपर्क साधून मदती साठी लागणारी यंत्रणा उपलब्ध करून देत आहेत.