तेरेखोल नदीच्या रौद्ररूपामुळे ओटवणेतील अनेक गावे पाण्याखाली…

567
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओठवणे ता.०६: तेरेखोल नदीच्या रौद्ररूपामुळे ओठवणे दशक्रोशीतील अनेक गावे जलमय झाली असून, पूरस्थिती मुळे या परिसरात घबराट पसरली आहे.तेरेखोल नदीला आलेल्या पुरामुळे ओठवणे दशक्रोशीतील काही गावे पाण्याखाली गेली आहेत.ओठवणे,विलवडे,सरमळे,बावळाट,नांगरतास,कोनशी या नदीलगतच्या गावांमध्ये पाणी शिरले असून अनेक घरांना नदीच्या पाण्याने वेढा दिला आहे.अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून,न थांबणारा पाऊस व तेरेखोल नदीचे रौद्ररूप पाहता परिस्थिती अधिकच धोकादायक होण्याची शक्यता आहे.तेरेखोल नदीला गेल्या ५० वर्षात प्रथमच असा मोठा महापूर आला आहे.

गेले चार दिवस सर्वत्र मुसळधार पाऊस पडत आहे.मंगळवारी तर सावंतवाडी तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस कोसळला.या पावसाने सर्वांचीच दाणादाण उडवली असून,जनजीवन विस्कळीत झाले आहे.दरम्यान, तेरेखोल नदीला महापूर आला असून,नदीचे पाणी लगतच्या गावांमध्ये शिरले आहे.तेरेखोल नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका ओठवणे,विलवडे,सरमळे या गावांना बसला आहे.ओठवणे रवळनाथ मंदिरा पर्यंत पुराचे पाणी घुसले असून,तेथील भिवसेन गावकर व रामचंद्र गावकर यांची घरे पाण्या खाली गेली आहेत.सरमळे अमराईवाडी येथील पंधरा घरे पाण्याखाली गेली असून,विलवडे पिसांची वाडी येथील पाच घरांना पाण्याने पूर्णपणे वेढा दिला असून घरांना पूर्णपणे पाण्याने वेढल्याने तेथे १५ लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
पूरस्थिती तसेच मुसळधार पाऊस यामुळे ओठवणे दशक्रोशीतील शेती बागायतीचे नुकसान लाखोंच्या घरात पोहचले आहे.कोनशी येथील साकव वाहून गेल्याने कोनशी,नांगरतास या गावांचा संपर्क तुटला आहे.ओटवणे गावठणवाडी येथील रामा तारी यांच्या घरावर माडाचे झाड पडून पडून सुमारे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.दाभिल नदीवरील सरमळे पूल सतत पाण्याखाली असल्याने बांदा-आंबोली राज्य मार्ग दिवसभर बंद होता.पूरस्थिती,मुसळधार पाऊस तसेच गेले दोन दिवस वीजपुरवठा बंद असल्याने ओठवणे दशक्रोशीचा अन्य भागाशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

\