थाई बॉक्सिंग स्पर्धेत करुळ गावच्या आर्यन कोलतेने कास्य पदक पटकाविले

2

वैभववाडी/प्रतिनिधी : हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत वैभववाडी तालुक्यातील करुळ गावचा सुपूत्र आर्यन विजय कोलते या युवा खेळाडूने कास्यं पदक पटकावले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. थाई बाँक्सिंगमध्ये राष्ट्रीय पातळीवर आर्यन याने उज्वल यश संपादन केल्या बद्दल युवा नेते आ. नितेश राणे यांनी त्याचे अभिनंदन केले.

कु. आर्यन सध्या पेस आयआयटी कॉलेज ठाणे येथे अकरावी इयत्तेत शिकत आहे. थाई बॉक्सिंग असोसिएशन जिल्हा ठाणे यांच्या वतीने जूनमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत आर्यन याने सुवर्ण पदकाची कमाई केली. नुकतीच लातूर येथे राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून जवळपास ४५० खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्र थाई बॉक्सिंग असोसिएशन (MTA) यांच्या मार्फत ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत आर्यन याने सिल्वर मेडल खिशात टाकत आपली घौडदौड कायम राखली. नुकतीच हैदराबाद येथे थाई बॉक्सिंग इंडियन फेडरेशनच्या वतीने राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धा पार पडली. आर्यन ने या स्पर्धेत कास्यं पदक पटकावत दबदबा कायम राखला आहे. आर्यन याला प्रशिक्षक बाळा साठे ठाणे यांचे मार्गदर्शन लाभले. आर्यन चे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

फोटो- आर्यन कोलते.

3

4