मारहाण प्रकरणी आंबडपाल येथील १३ जणांची जामीनावर मुक्तता

2

कुडाळ, ता. ५ : देवस्थानावरून निर्माण झालेल्या वादातून लाकडी दांडे लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केल्याप्रकरणी आंबडपाल येथील १३ जणांची आज येथील न्यायालयाने ७ हजारांच्या जामीनावर मुक्तता केली.
दिनकर सावंत,प्रवीण सावंत,दशरथ सावंत,रामदास नाईक,विजय सावंत, बाळकृष्णा सावंत,सहदेव सावंत, नीलकंठ माईणकर,सुरेश तानीवडे, ज्ञानेश्वर माईणकर,मोहन नाईक, शंकर सावंत,विलास सावंत, सुर्यकांत सावंत सर्व रा.आंबडपाल, ता-कुडाळ, जि-सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. हा प्रकार आंबडपाल गावात घडला होता. यात ग्रामस्थांनी दिवाणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे महाशिवरात्र उत्सवाचे आयोजन बाबत सल्लामसलत करण्यासाठी बैठक बोलावली होती. यावेळी दोन गटात वाद झाले.यावेळी दोन्ही बाजूने फरशी, लाकडी, दांडे,माईक,स्टँड,लोखंडी,सळ्या घेऊन मारहाण करण्यात आली होती. याबाबत या १३ जणांवर पुढे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर आज सुनावणी झाली त्यात सबळ पुराव्याअभावी त्या तेराही जणांची सात हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली.याकामी अॅड.अनिल निरवडेकर, अॅड. गणेश चव्हाण, शब्बिर लांबे, अशोक जाधव यांनी काम पहिले.

4