मालवण, ता. ६ : शहरात धोकादायक बनलेल्या पडीक घरांच्या भिंती नगरपालिकेचे बांधकाम सभापती गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी स्वखर्चाने आज हटविल्या. नागरीकांच्या तक्रारीनंतर मेढा परिसरातील तीन धोकादायक भिंती तत्काळ उदध्वस्त करण्यात आल्या.
गेले दोन ते तीन दिवस शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पडीक घराच्या भिंती धोकादायक बनल्या आहेत. पावसाचे पाणी साचुन या भिंती पडुन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच नागरिकांनी याबाबतची तक्रार नगरपालिकेकडे केली.
नगरपालिकेचे बांधकाम सभापती गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेसीबीच्या सहाय्याने मेढा आढाव बिल्डींग येथील श्री पाटकर व श्री. खोत यांच्या तसेच मेढा राममंदिर नजीक पडीक घराच्या धोकादायक भिंत हटविण्यात आली. यावेळी जोरदार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झालेल्या पडझडीची पाहणी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, सुदेश आचरेकर, गणेश कुशे, दिपक पाटकर यांनी केली.
शहरातील धोकादायक पडीक घरांच्या भिंती हटविल्या… गणेश कुशे, सुदेश आचरेकर यांनी स्वखर्चातून केली कार्यवाही : शहरातील पडझडीचीही केली पाहणी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES