भरड मुख्य रस्त्यावरील ‘तो’ खड्डा बुजविला…

189
2

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्याकडून तत्काळ कार्यवाही…

मालवण, ता. ६ : शहरातील खानोलकर सर्व्हिसिंग सेंटर येथील मुख्य रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला होता. आज नगरपालिकेच्या माध्यमातून हा खड्डा बुजविण्याची कार्यवाही करण्यात आली.
शहरातील प्रवेशाचा मुख्य असलेल्या रस्त्यावर मध्यभागी दोन, तीन दिवसांपूर्वी भला मोठा खड्डा पडला. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना याचा अंदाज न आल्यास अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचे लक्ष वेधले असता त्यांनी तत्काळ तो खड्डा बुजवून घेण्याची कार्यवाही केली.
यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, बांधकाम सभापती गणेश कुशे, नगरसेवक दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आदी उपस्थित होते.

4