नितेश राणे:ट्विटद्वारे मोदी सरकार कडे केली मागणी…
कणकवली ता.०६ काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडून मोदी सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.आता बेळगाव महाराष्ट्रात सामील करा आणि अनेक वर्षाची मागणी पूर्ण करा अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
श्री.राणे यांनी याबाबत ट्विट केले आहे.त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याचा आणि काश्मीरच्या विभाजनाचा प्रस्ताव मांडला.त्यानुसार राज्याचे विभाजन करून जम्मू–काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करण्यात आले.मोदी सरकारच्या निर्णयाचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.तर काही विरोधकांकडून विरोधही करण्यात येत आहे. मात्र कित्येक वर्षांपासून प्रलंबित असणारी बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्याची मागणी आता पुर्ण करा असे त्यांनी या ट्वीट मध्ये म्हटले आहे.