दिल्ली ता 6
देशाच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे उपचारादरम्यान दिल्ली येथे निधन झाले.
हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता त्यामुळे अधीक उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्या किडनीच्या आजाराने त्रस्त होत्या, त्यामुळे त्यांनी नव्याने झालेल्या मंत्रिमंडळ आपल्याला मंत्रिपद नको अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र आपल्याला आता तब्येत साथ देत नाही त्यामुळे आपण जबाबदारी घेत नाही असे त्यांनी जाहीर केले होते.गेले काही दिवस त्या आजारी होत्या अशाच परिस्थितीत त्यांची आज रात्री प्राणज्योत मालवली.
याबाबतची माहिती कळताच काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी,पी चिदंबरम, नितीन गडकरी आदींनी त्या ठीकाणी धाव घेतली