माजगावात बिबट्याची पुन्हा दहशत ,कुत्र्यावर हल्ला

2

सावंतवाडी/भक्ती पावसकर
माजगाव मध्ये काल हजेरी लावलेल्या बिबट्याने आज येथील दत्त मंदिर परिसरात थैमान घातले. त्या ठिकाणी राहणाऱ्या मयूर पावसकर यांच्या कुत्र्या वर हल्ला करून त्यांने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.
याबाबतची माहिती श्री पावसकर यांनी दिली.कालपासून माजगाव परिसरात हा बिबट्या लोकांना दिसत आहे. येथील फॉरेस्ट कॉलनी रात्री साडेनऊ वाजता त्यांने अनेकांना दर्शन दिले होते आज मात्र येथील दत्त मंदिर परिसरात त्याने कुत्र्यावर हल्ला केला त्यामुळे या सर्व प्रकारामुळे भरवस्तीत बिबट्या फिरत असल्यामुळे ग्रामस्थ मात्र घबराटीचे वातावरण आहे योग्य तो बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार घराची लाईट चालू केल्यानंतर त्या बिबट्याने  जंगलाच्या दिशेने पलायन केले

11

4