आंबोली घाट तब्बल तीस तासांनी वाहतुकीस सुरू…

449
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दरडीचे संकट मात्र कायम:प्रवाशांची टाकला सुटकेचा निश्वास…

आंबोली.ता,७: दरड कोसळल्यामुळे तब्बल तीसहून अधिक तास बंद असलेला आंबोली घाट अखेर वाहतुकीस खुला झाला आहे. रात्री कोसळलेला दरडीचा काही भाग बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
दरम्यान कोसळलेला भाग काढण्यात यश आले असले. तरी घाटावर दरडीचे संकट कायम आहे. दरड कोसळली त्या ठिकाणी पाणी आणि माती कोसळत असल्यामुळे पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे शक्यता सावंतवाडीतील युवा कार्यकर्ते अमेय प्रभू तेंडुलकर यांनी सांगितले. ते आंबोली येथे अडकले होते. आंबोली घाटातील दरड काल पहाटे सकाळी कोसळली होती. यात पोलिसांची गाडी सुद्धा सुदैवाने वाचली होती. दरम्यान झाडे आणि दरडी बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु पुन्हा त्या ठिकाणी मातीचा भला मोठा ढिगारा कोसळला त्यामुळे पुन्हा घाट बंद झाला .परिणामी सावंतवाडी आंबोली हा राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. रात्री उशिरा पुन्हा मोहीम राबविण्यात आली. आणि अखेर आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घाट रस्ता पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. परंतु घाटावर दरडीचे संकट कायम आहे.

\