सावंतवाडीत मोती तलावाकाठच्या दिव्यांना “शाॅक”…

304
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेळीच दखल घेतल्याने दुर्घटना टळली; खबरदारी घेण्याची विनोडकर यांची मागणी…

सावंतवाडी ता.०७: येथील पालिकेच्या वतीने मोती तलावाच्या काठावर बसविण्यात आलेल्या पथदीपातील विद्युत प्रवाह काल रात्री लिकेज झाल्याचा प्रकार घडला.यात शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजू विर्नोडकर यांच्या कुत्र्या सह त्यांनासुद्धा विजेचा धक्का बसला.हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ वीज वितरण कंपनी व नगरपालिकेशी संपर्क साधला.घटनेची माहिती मिळताच त्या ठीकाणी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी धाव घेतली व वीज पुरवठा खंडित करायला लावला,अन्यथा या ठिकाणी मोठा अनर्थ घडला असता.या सर्व प्रकाराबाबत श्री.विर्नोडकर यांनी नाराजी व्यक्त करत पालिकेने योग्य ती दक्षता घ्यावी,जुन्या वायर बदलाव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.
काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्री.विर्नोडकर हे आपल्या कुत्र्याला घेऊन तलावाच्या काठावर फिरण्यासाठी आले होते.दरम्यान त्यांचा कुत्रा तेथील एका पथदीपाच्या शेजारी जाताच त्याने किंकाळी मारली.त्यामुळे त्या ठिकाणी काय आहे,हे पाहण्यासाठी श्री.विर्नोडकर गेले असता,त्यांनाही विजेचा सौम्य धक्का बसला.त्यामुळे त्यांनी आपल्या घरातील टेस्टर आणून वीज प्रवाह लिकेज झाल्याची खात्री केली.दरम्यान चक्क टेस्टर प्रवाहित झाल्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.त्यांनी घटनास्थळी थांबून घटनेची माहिती संबंधित परिसरात येणाऱ्या नागरिकांना दिली.तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती प्रसारित केली.त्यामुळे या ठिकाणी होणारा मोठा अनर्थ टळला.तर या ठिकाणी आलेल्या एखाद्या पादचाऱ्यांचा पथदीपांना स्पर्श झाला असता तर विजेचा मोठा धक्का बसला असता असेही त्यांनी सांगितले.

\