तिलारी धरणाचे पाणी घुसून अनेक घरे पाण्याखाली

1408
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार.ता,०७: तिलारी धरणामुळे पाण्याचा प्रवाह गावोगावी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घोटगे परमे घोटगेवाडी वायंगतड आवाडे आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे या पुरामुळे गावातील घरे पाण्याखाली गेली आहेत घरातील लोकांना इतर ठिकाणी हलविण्यात आले आहे. घोटगे परमे येथील केळी सुपारीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत तर परमे येथील डोंगर तिलारी येथून येणाऱ्या कालव्यामध्ये कोसळला आहे त्यामुळे कालव्यांमधून सोडले गेलेले धरणाचे पाणी कालव्याच्या विरुद्ध दिशेने वाहत आहे त्यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास कालवा फुटण्याची दाट शक्यता आहे.

\