भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले च्या वतीने मच्छिमार वस्तीत शालेय मुलांना दप्तर वाटप

158
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.०७ : भारतीय जनता पार्टी, वेंगुर्लेच्या वतीने प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरद चव्हाण पुरस्कृत मच्छिमार वस्तीतील मुलांना स्कुल बॅगचे वाटप करण्यात आले.
उभादांडा – नवाबाग शाळेतील बालवाडी ते सातवी पर्यंतच्या ५० मुलांना शालेय दप्तराचे वाटप श्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, नगरसेवक सुहास गवंडळकर, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर, मच्छिमार सोसायटी चेअरमन राजेंद्र कुबल, बुथप्रमुख प्रकाश मोटे, जेष्ठ मच्छिमार नेते अशोक खराडे, दशरथ तांडेल, मुकुंद खडपकर, रामा आरोंदेकर, सुधाकर वेंगुर्लेकर, दत्ताराम कोळंबकर,शामसुंदर कोळंबकर, दिगंबर मोर्जे, नाना आरावंदेकर, अशोक मोर्जे, सौ.गीरप, सौ.मोर्जे व शिक्षीका सौ. आपटे तसेच शिक्षक व पालकवर्ग उपस्थित होते.

\