पूरग्रस्त व धोकादायक घाटांची उद्या करणार पाहणी : दीपक केसरकर

262
2

बांदा,ता.७ : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तीनही घाट बंद होते आता मात्र आंबोली व फोंडा घाट सुरू झाला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी उद्या आपण मतदारसंघाचा दौरा करणार आहे अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
ते पुढे म्हणाले जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यात येणारे तीनही घाट रस्ते बंद झाले होते. आंबोली घाट धोकादायक आहे त्यावर योग्य ते नियोजन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. उद्या आपण स्वतः या घाट रस्त्यासमवेत पूरग्रस्त भागांची पाहणी करणार आहे

4