भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले च्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

127
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले. ता,७: भारतीय जनता पार्टी , वेंगुर्ले च्या वतीने साईमंगल कार्यालय येथे वेंगुर्ले तालुक्यातील शैक्षणिक , कला व क्रीडा क्षेत्रातल्या १२० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
शालेय गटातील स्काॅलरशीप पासून पदविधर गुणवंतांचा सत्कार तसेच कला व क्रीडा क्षेत्रातल्या विशेष प्राविण्य मिळवलेल्यांचा ही सन्मान केला.
त्याचप्रमाणे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलांच्या सत्कारासोबत गरीब मुलांना शालेय पास , वह्या पुस्तकांसाठी मदत तसेच गणवेशासाठी व काॅलेज फीसाठी आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली , प्रदेश कार्यालयीन सहसचिव शरदजी चव्हाण , नगराध्यक्ष राजन गिरप , तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , उपसभापती स्मिता दामले , जिल्हा चिटनीस साईप्रसाद नाईक , विस्तारक पंकज बुटाला , बॅ.नाथ पै संस्थेचे उमेश गाळवनकर , खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक वामन गावडे , शिक्षक परिषद अध्यक्ष सोनसुरकर,नगरसेवक सुहास गवंडळकर , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका श्रेया मयेकर , इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा व्रुंदा गवंडळकर , जेष्ठ नेते बाळा सावंत , ओबीसी सेलचे रमेश नार्वेकर , किसान मोर्चा चे महादेव शेगले गुरूजी , ता. सरचिटणीस प्रशांत खानोलकर , युवा मोर्चाचे हर्षद राऊळ , सुरेंद्र चव्हाण , दिपक माडकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजन तेली म्हणाले की ह्या सत्कार मुर्तीनी आपले पुढील ध्येय हे आय एस किंवा आय.पी.एस.होण्याचे ठेवले पाहिजे . कोकणातील निकाल हे सातत्याने महाराष्ट्रात एक नंबरचे येत आहेत. त्याचे सर्व श्रेय हे विद्यार्थी – पालक – शिक्षक यांना जाते. सातत्याने निकालाची चढती कमान चालत असल्याने शैक्षणिक क्षेत्रात *सिंधुदुर्गपॅटर्न* तयार झाला आहे. या सत्कार समारंभात १०० % निकाल लागलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा सन्मान शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी केले व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले.